बातम्या
कोल्हापूर मधील मराठी साहित्यातील बौद्धिक संपदा मौल्यवान – जिल्हाधिकारी अमोल येडगे
By nisha patil - 3/10/2025 3:28:27 PM
Share This News:
कोल्हापूर मधील मराठी साहित्यातील बौद्धिक संपदा मौल्यवान – जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर, दि. ३ : कोल्हापूर ही सांस्कृतिक परंपरेने समृद्ध नगरी असून मराठी साहित्यविश्वातील तिची बौद्धिक संपदा अत्यंत मौल्यवान आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. वि.स. खांडेकर, शिवाजी सावंत, विश्वास पाटील, ना.धों. महानोर, जयंत नारळीकर यांसारख्या साहित्यिकांनी मराठी भाषेला अनमोल योगदान दिले असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जिल्हा मराठी भाषा समिती व न्यू कॉलेज मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी दिन न्यू कॉलेज येथे साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात प्रमुख वक्ते ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुनिलकुमार लवटे म्हणाले, “वि.स. खांडेकर, शिवाजी सावंतांसारखे लेखक आजच्या काळात पुन्हा निर्माण व्हावेत, अशी गरज आहे.”
या प्रसंगी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील, प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, समिती अध्यक्ष प्रा. डॉ. गुंडोपंत पाटील, उपाध्यक्ष डॉ. एकनाथ पाटील, ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी येडगे यांनी कोल्हापूरमध्ये जिल्हा ग्रंथालय शासकीय जागेवर उभारून ते अधिक समृद्ध करण्यासाठी तातडीने गती देण्याचे आश्वासन दिले. तसेच विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे दूत म्हणून कार्य करून भाषा अधिक समृद्ध करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कोल्हापूर मधील मराठी साहित्यातील बौद्धिक संपदा मौल्यवान – जिल्हाधिकारी अमोल येडगे
|