शैक्षणिक

टीईटी–सेट पेपरफुटीचा आंतरराज्य पर्दाफाश; तपासावर दबाव, विद्यार्थ्यांवर टांगती तलवार

Inter state TET SET paper leak exposed


By nisha patil - 11/28/2025 3:20:20 PM
Share This News:



टीईटी–सेट पेपरफुटीचा आंतरराज्य पर्दाफाश; तपासावर दबाव, विद्यार्थ्यांवर टांगती तलवार

टीईटीसोबत सेट परीक्षेच्या पेपरफुटीचे लोण आता थेट आंतरराज्य पातळीपर्यंत पसरल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. फुटलेल्या प्रश्नपत्रिका दीडशे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज असून, त्यांच्यावर चौकशीची टांगती तलवार आहे. चौकशी न झाल्यास प्रामाणिक परीक्षार्थींवर अन्याय होईल, अशी नाराजी व्यक्त होत आहे.

या प्रकरणात राजकीय व्यक्तींपासून ते परीक्षा नियंत्रक यंत्रणेपर्यंत काही जणांचे हात गुंतल्याची चर्चा असून, पोलिस तपासावर मोठे दडपण असल्याच्या संकेतांमुळे सत्य अजूनही गुलदस्त्यातच आहे.

कठीण टीईटी–सेट परीक्षांसाठी हजारो विद्यार्थी प्रचंड मेहनत घेतात, तर पेपरफुटीच्या माध्यमातून कोट्यवधी कमावणारे मात्र ऐशोआरामात जगत असल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे या परीक्षांची पारदर्शकता आणि खरी गुणवत्ता तपासण्याची वेळ आली असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.


टीईटी–सेट पेपरफुटीचा आंतरराज्य पर्दाफाश; तपासावर दबाव, विद्यार्थ्यांवर टांगती तलवार
Total Views: 11