बातम्या

विवेकानंद कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय एड्स दिन साजरा

International AIDS Day celebrated


By nisha patil - 2/12/2025 3:45:02 PM
Share This News:



 विवेकानंद  कॉलेजमध्ये  आंतरराष्ट्रीय  एड्स  दिन  साजरा

 कोल्हापूर दि.02 : मानवी जीवन संपन्न आणि समृध्द् बनविण्यासाठी रोगमुक्त असले पाहिजे. 21 व्या शतकाच्या मध्यापासून संपूर्ण मानव जातीस शाप ठरलेला एचआयव्ही- एडस हा जीव घेणारा, संसर्गित होणारा रोग विकसनशील आणि मागास देशांमध्ये मानवी आरोग्यास आवाहन ठरत आहे. एचआयव्ही एड्स संक्रमणाचे मार्ग आणि आपण घ्यावयाची खबरदारी याविषयी सर्वानी शास्त्रीय पद्धतीने माहिती घ्यावी, जागरूक व्हावे. समाजामध्ये एचआयव्ही संक्रमित व्यक्तींना दिलासा देऊन त्यांना सकारात्मक जीवन जगण्यासाठी सहाय्य करावे असे  मत सी.पी.आर. मधील कोल्हापूर जिल्हा कार्यक्रम अधिकारी दिपा शिपूरकर व सौ.सुरेखा जाधव, समुपदेशिका,पंचगंगा हॉस्पीटल यांनी मांडले.

आंतरराष्ट्रीय एड्स दिन जनजागृतीचे आयोजन महाविद्यालयातील रेड रिबन क्ल्ब च्या नोडल ऑफिसर मेजर सुनिता भोसले, आयक्युएसी प्रमुख डॉ.श्रुती जोशी, एनसीसी आणि एनएसएस विभाग यांचे मार्फत करण्यात आले.

यावेळी एन.सी.सी. मुली विभागाच्या वतीने विवेकानंद कॉलेज ते सी.पी.आर.हॉस्पीटल अशी सायकल रॅली आयोजित केली होती.       प्रा.गीतांजली साळुंखे यांचेकडून यावेळी एच. आय. व्ही. एड्स रोगमुक्त भयमुक्त आणि जागरूक होण्यासाठी शपथ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देणेत आली. यावेळी के.आय.टी. रोटरॅक्ट् क्ल्ब तर्फे पथनाटय सादर केले.

कार्यक्रमासाठी प्रा.एम.आर.नवले, प्रा एस एस जगताप, प्रा एस एम पाटील,  डॉ. प्रविण बागडे, लेफ्टनंट जे आर भरमगोंडा, प्रा.एल.एस.नाकाडी उपस्थित होते महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एच.जी.पाटील यांनी केले तर आभार सिनिअर अंडर ऑफिसर सायली वडकर हिने मानले. कार्यक्रमासाठी एनसीसीचे छात्र आणि  एन. एस. एस. चे  स्वयंसेवक उपस्थित होते . 


विवेकानंद कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय एड्स दिन साजरा
Total Views: 19