विशेष बातम्या
Gokul...‘गोकुळ’मध्ये सहकार सप्ताह व आंतरराष्ट्रीय सहकार दिन उत्साहात साजरा
By nisha patil - 5/7/2025 8:12:35 PM
Share This News:
‘गोकुळ’मध्ये सहकार सप्ताह व आंतरराष्ट्रीय सहकार दिन उत्साहात साजरा
– विविध उपक्रमांना चांगला प्रतिसाद, महिलांच्या स्टॉल्सला भरघोस उलाढाल
कोल्हापूर, दि. ५ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) यांच्या वतीने भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या स्थापना सप्ताह (२५ जून ते ६ जुलै) व आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावर्षीची थीम “सहकार सर्वांसाठी चांगले भविष्य घडवतात” या संकल्पनेवर आधारित उपक्रम उत्साहात पार पडले.
गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयात विविध माहितीपर स्टॉल्स उभारण्यात आले होते. दुग्धजन्य पदार्थ, महालक्ष्मी पशुखाद्य, आयुर्वेदिक उत्पादने, महिला डेअरी सहकारी विकास व स्लरी उत्पादने अशा स्टॉल्सना भरघोस प्रतिसाद मिळाला. उद्घाटन जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे व सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांच्या हस्ते झाले.
ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या हस्ते सहकार ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. ‘सहकार’ विषयावर डॉ. एम. पी. पाटील यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यानही झाले. महिला बचत गट व गोकुळ स्टॉल्सवर ५० हजार रुपयांची उलाढाल झाली.
संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सर्व दूध उत्पादक, ग्राहक, वितरक व हितचिंतकांना आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास संघाचे माजी चेअरमन, संचालक, अधिकारी, कर्मचारी, दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Gokul...‘गोकुळ’मध्ये सहकार सप्ताह व आंतरराष्ट्रीय सहकार दिन उत्साहात साजरा
|