राजकीय
गोकुळमध्ये आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा..
By nisha patil - 4/12/2025 11:11:52 AM
Share This News:
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साधेपणाने आणि सन्मानपूर्वक साजरा करण्यात आला. संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात दिव्यांग कर्मचार्यांना शुभेच्छा देत त्यांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी दिव्यांग कर्मचार्यांचे कौतुक करताना सांगितले की, “हा दिवस समाजातील दिव्यांग व्यक्तींच्या योगदानाची दखल घेण्यासाठी साजरा केला जातो. दिव्यांग कर्मचारी कोणत्याही संस्थेचा अविभाज्य भाग आहेत. त्यांना समान संधी, प्रोत्साहन आणि सहकार्य मिळाले तर ते अधिक प्रभावीपणे कामगिरी करू शकतात.”
कार्यक्रमात दिव्यांग कर्मचारी पांडुरंग शेळके यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, युवराज पाटील, शशिकांत पाटील–चुयेकर, बयाजी शेळके, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोकुळमध्ये आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा..
|