विशेष बातम्या
विवेकानंद कॉलेज मध्ये ‘इकोक्लब’ च्या वतीने आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा
By nisha patil - 12/12/2025 5:44:35 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेज मध्ये ‘इकोक्लब’ च्या वतीने आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा
कोल्हापूर, दि.12 : दि. ११ डिसेंबर २०२५ रोजी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज येथे ‘इकोक्लब’च्या वतीने आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा करण्यात आला. दरवर्षी ११ डिसेंबर रोजी संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय पर्वत दिन हा पर्वतांच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. विवेकानंद कॉलेज मध्ये पर्वतांविषयी पोस्टर प्रदर्शन हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी पृथ्वीवरील हवामान बदलासारख्या धोक्यांविरुद्ध तसेच गोड्या पाण्याबद्दल त्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकणारे पोस्टर्स प्रदर्शित केले. यावेळी प्रा डॉ ए जे पाटील व प्रा श्री एच जी पाटील यांनी पाणी, अन्न, जैवविविधता आणि उपजीविकेसाठी पर्वतांचे महत्त्व विद्यार्थ्यांना स्पष्ट केले.
पर्वतांबद्दल जागतिक जागरूकता वाढवण्यासाठी, हवामान बदलासारख्या धोक्यांवर प्रकाश टाकण्यासाठी आणि शाश्वत पर्वतीय विकासाला चालना देण्यासाठी दरवर्षी ११ डिसेंबररोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा केला जातो. जैवविविधता, पर्यावरण संवर्धन मोहीम आणि शाश्वत पर्वतीय विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पर्वतीय परिसंस्था आणि लोकांचे संरक्षण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी व समाजाने द्यावयाच्या योगदानाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आंतरराष्ट्रीय पर्वत दिन हा उपक्रम आयोजित करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी थोरात , विज्ञान विभाग प्रमुख प्रा श्री एम आर नवले, SQAAF प्रमुख प्रा सौ गीतांजली साळुंखे, स्टाफ सेक्रेटरी प्रा श्री एस टी शिंदे, रजिस्ट्रार श्री एस के धनवडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच कॉलेजमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य मिळाले.
विवेकानंद कॉलेज मध्ये ‘इकोक्लब’ च्या वतीने आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा
|