बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
By nisha patil - 6/21/2025 11:17:13 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
कोल्हापूर दि.21 : शरीर व मन निरोगी राहण्यासाठी सर्वानी नियमितपणे योगा करणे आवश्यक आहे. योगाचे महत्व् अनमोल आहे. योग आपल्या शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक स्तरावर संतुलित आणिनिरोगी जीवनशैली जगण्यास मदत करतो. योगामुळे शरीराची लवचिकता वाढते, तणाव कमी होतो, एकाग्रता आणि आंतरिक शांतता लाभते. योग आणि धारणा याद्वारे दैनंदिन जीवनातील ताण तणाव कमी करून आपणास इच्छित असणारे ध्येय साध्य करता येते. योगामुळे आपणास सुदृढ शरीरासोबत परिपक्व मनाची निर्मिती करता येते. असे मत प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी विवेकानंद कॉलेजमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी मांडले.
21 जून 2025 या 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम डॉ. राजश्री पाटील, योग प्रशिक्षिका, आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी देविका माने, शिवदिप वेदपाठक, अभिजीत यांनी योग, यम, नियम धारणा, प्रत्याहार याचे विवेचन निरनिराळ्या योग आसनांच्याद्वारे कृती आधारित योगासने विद्यार्थ्यांच्या कडून करवून घेतली .
सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन आय.क्यु.ए.सी. डॉ. श्रुती जोशी, जिमखाना प्रमुख डॉ.विकास जाधव, एन.सी.सी. प्रमुख मेजर सुनिता भोसले, एन.एसएस विभागाचे डॉ.संदीप पाटील यांच्यामार्फत करण्यात आले. या कार्यक्रमास श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्था सेक्रेटरी मा.प्राचार्या सौ शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा.कौस्तुभ गावडे , 6 महाराष्ट्र एनसीसी गर्ल्स् बटालियनचे कर्नल संधान मिश्रा यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत जिमखाना प्रमुख डॉ. विकास जाधव यांनी केले तर आभार
प्रा सुप्रिया पाटील यांनी मानले. सुत्रसंचालन एन.सी.सी. कॅडेट सायली वडकर यांनी केले. सदरच्या कार्यक्रमासाठी प्रा.सौ शिल्पा भोसले, प्रा अशोक पाटील, प्रा एम आर नवले, प्रा बी एस कोळी, प्रा संतोष कुंडले, प्रा समिर पठाण, प्रा एस टी शिंदे, प्रा प्रशांत कांबळे, प्रा.साद मुजावर ,एनसीसी चे कॅडेट्स, एन. एस. एस.स्वयंसेवक, ज्युनियर सिनिअर कॉलेजचे प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते . कार्यक्रमाच्या यशस्वी संपन्नतेसाठी, रजिस्टार श्री एस के धनवडे व प्रशासकीय कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
विवेकानंद कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
|