विशेष बातम्या
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न
By nisha patil - 6/23/2025 12:11:12 PM
Share This News:
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न
कोल्हापूर दसरा चौक येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगा प्रात्यक्षिक घेण्यात आली. या प्रात्यक्षिकासाठी श्री नितीन खराडे व सौ साधना खराडे यांनी आसना बरोबर प्रणायाम व त्याचे फायदे विशद केले. या कार्यक्रमास प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, खेळाडू, एनसीसी कॅडेट व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमास श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. मानसिंग बोंद्रे दादा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवान, आय. क्यू . ए.सी. समन्वयक डॉ. आर. डी. मांडणीकर, सह समन्वयक डॉ. ए. बी. बलुगडे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे संयोजन जिमखाना प्रमुख कॅप्टन डॉ. प्रशांत पाटील व प्रा. प्रशांत मोठे यांनी केले.
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न
|