कृषी
वारसा वृक्षांच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय तज्ञ जॉन पार्कर यांचे भारतात आगमन
By nisha patil - 12/13/2025 12:29:46 PM
Share This News:
मुंबई : वारसा वृक्षांच्या संवर्धनासाठी जागतिक पातळीवर कार्य करणाऱ्या इंग्लंड येथील. यावेळी वृक्ष संवर्धन तज्ञ वैभव राजे यांच्यासह आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्टचे मुकुल म्हात्रे, राहुल कांबळे, पंकज देहगावकर, महेंद्र हौसनूर उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील वारसा वृक्ष (हेरिटेज ट्री) आंतरराष्ट्रीय नकाशावर यावेत, यासाठी आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्ट व आझाद हिंद नेचर आर्मी प्रयत्नशील आहेत. याच अनुषंगाने संस्थापक अध्यक्ष राहुल मगदूम यांनी युके आर्बोरिकल्चर असोसिएशनचे सीईओ जॉन पार्कर यांच्याशी संपर्क साधला होता. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत पार्कर भारतात येणार होते; मात्र कौटुंबिक अडचणींमुळे मागील महिन्यात त्यांचा दौरा रद्द झाला होता.
आता दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यात (१४ व १५ डिसेंबर) ते आजरा–शिरशिंगी येथील भारताचा राष्ट्रीय वृक्ष वड, शाहूवाडीतील खेडे येथील महाकाय बेहडा, कोल्हापूर शहरातील गोरख चिंच, महावीर उद्यानातील कैलासपती, तसेच टाऊन हॉल परिसरातील दुर्मिळ वृक्षांची पाहणी करणार आहेत. यासह चुये येथील नदीकाठचा वड या ठिकाणीही ते भेट देणार आहेत, अशी माहिती राहुल मगदूम यांनी दिली.
वारसा वृक्षांच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय तज्ञ जॉन पार्कर यांचे भारतात आगमन
|