बातम्या

क्रीडादिनी "कोरगांवकर" मध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंची उपस्थिती

International players present


By nisha patil - 1/9/2025 4:11:08 PM
Share This News:



क्रीडादिनी "कोरगांवकर" मध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंची उपस्थिती

कोल्हापूर  :   आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित सदर बाजार येथील कोरगांवकर हायस्कूलमध्ये जानकी मोकाशी, संतोष रांजणगे आणि सुप्रिया तावडे या पॅरा स्पोर्ट्स अकादमीच्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडूंनी आपले विविध क्रीडाप्रकारातील अनुभवकथन करून विद्यार्थ्यांना प्रेरित केले .

यामध्ये जानकी मोकाशी यांनी शरीर अपंग असले तरी मन अभंग ठेवल्याने तलवारबाजी, हॅन्डबॉल या प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली असे सांगितले . सुप्रिया तावडे यांनी कृत्रिम पायानीशी खेळून ॲथलेटिक्स प्रकारात सुयश संपादन करता आले असे सांगितले तर संतोष रांजगणे यांनी व्हीलचेअर क्रिकेट या क्रीडाप्रकारात भारतीय संघात स्थान मिळाल्याने आयुष्याचे सोने करता आले असे प्रतिपादन केले . प्रारंभी जानकी मोकाशी यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलीत करून मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला .

क्रीडाशिक्षक सदाशिव -हाटवळ यांनी प्रास्ताविक करतानाच राष्ट्रीय क्रीडादिनाची संकल्पना विशद केली . सई गवळी, सलीम मणियार यांनी  मनोगत व्यक्त केले . पर्यवेक्षिका सुरेखा पोवार यांनी उपस्थितांचे आभार मानले . संतोष रांजगणे यांनी घेतलेल्या क्रीडा प्रश्नावलीस विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला . यावेळी शीतल गणेशा चार्य, निवेदिता पवार, विद्या बाचणकर, तृप्ती रावराणे आदी मान्यवर उपस्थित होते .


क्रीडादिनी "कोरगांवकर" मध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंची उपस्थिती
Total Views: 70