बातम्या

एक्सक्लूझिव मुलाखत

Interview


By nisha patil - 5/30/2026 11:41:32 AM
Share This News:



**एक्सक्लूझिव मुलाखत*

**आजरा प्रतिनिधी हसन तकीलदार* सर्व जाती धर्माचा मराठी भाषा बोलणारा माणूस तो मराठी माणूस. त्या माणसाची भाषा, त्या माणसाची शाळा, त्या माणसाचा रोजगार या सगळ्यांचा एकत्रित विचार करणारं जे आंदोलन आहे, सांस्कृतिक राजकारण आहे ते म्हणजे मराठी कारण आणि त्याचा पाया आहे तो महाराष्ट्र धर्म. जे रेशीमबाग पुरस्कृत राजकारण आहे त्याला आव्हान देणारं राजकीय कथन आहे. आपला महाराष्ट्र शिव शाहू फुले आंबेडकर विचाराचं आहे. महाराष्ट्र गेल्या काही वर्षांमध्ये शिव शाहू फुले आंबेडकरांची परंपरा विसरून ज्या प्रकारे हिंदुत्वच्या आणि धर्मांध ध्रुवीकरणाच्या राजकारणामध्ये गुंतला आहे त्याला आव्हान देण्याची क्षमता असणारं राजकारण महाराष्ट्रात महाराष्ट्र धर्मात आहे. असे मत डॉ. दीपक पोवार यांनी आमचे आजरा प्रतिनिधी हसन तकीलदार यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.


एक्सक्लूझिव मुलाखत
Total Views: 238