राजकीय

दि.२० रोजी शिवसेना इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती; आज दि.१६ रोजी पासून मुलाखत अर्ज वाटपास सुरवात : आमदार राजेश क्षीरसागर

Interviews of Shiv Sena interested candidates on 20th Distribution


By nisha patil - 12/16/2025 1:41:35 PM
Share This News:



कोल्हापूर दि.१६ : आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती दि.२० डिसेंबर २०२५ रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, क्रिस्टल टॉवर खानविलकर पेट्रोल पंप शेजारी,कोल्हापूर येथे पार पडणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. 
    या पत्रकात पुढे म्हंटले आहे कि, आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुती एकत्र लढणार आहे. या निवडणुकीत महायुतीचा भगवा महापालिकेवर फडकविण्यासाठी महायुतीमधील सर्वच पक्षांचे एकमत झाले आहे. शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री ना.मा.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षही निवडणुकीत संपूर्ण ताकतीने उतरत आहे. शिवसेनेकडे शहरातील विविध प्रभागात इच्छुक आणि सक्षम उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दि.२० डिसेंबर २०२५ रोजी दिवसभरात शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, क्रिस्टल टॉवर खानविलकर पेट्रोल पंप शेजारी,कोल्हापूर येथे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, माजी खासदार संजय मंडलिक, शिवसेना उपनेत्या माजी आमदार श्रीमती जयश्री जाधव,  जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, जिल्हा समन्वयक सत्यजित उर्फ नाना कदम, दक्षिण विधानसभा प्रमुख शारंगधर देशमुख, महानगरप्रमुख शिवाजी जाधव व जिल्हाप्रमुख विजय बलुगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहेत. या मुलाखतीवेळी प्रत्येक इच्छुक उमेदवाराची ओळख, त्यांच्या प्रभागातील सद्यस्थिती, सामाजिक कार्य, जनसंपर्क आणि राजकीय प्रवास याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यात येणार आहे. या मुलाखतीसाठी आवश्यक नोंदणी अर्ज (मुलाखत फॉर्म) आज दि.१६ डिसेंबर २०२५ रोजी पासून शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, क्रिस्टल टॉवर खानविलकर पेट्रोल पंप शेजारी,कोल्हापूर येथून वितरीत केले जाणार आहेत. तसेच दि.१७ ते १९ डिसेंबर २०२५ रोजी दरम्यान हे फॉर्म जमा करून घेतले जाणार असून, दि.२० रोजी मुलाखती पार पडल्यानंतर त्याचा अहवाल मध्यवर्ती पक्ष कार्यालयास सादर केला जाणार आहे. शिवसेना पक्षाकडून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी तात्काळ नोंदणी अर्ज स्वीकारून आवश्यक माहितीसह सदर अर्ज विहित तारखेच्या आत पक्ष कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.    


दि.२० रोजी शिवसेना इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती; आज दि.१६ रोजी पासून मुलाखत अर्ज वाटपास सुरवात : आमदार राजेश क्षीरसागर
Total Views: 41