बातम्या

crime news ....गांजासह इसम अटकेत; एलसीबीची कोतोलीत कारवाई

Isam arrested with ganja


By nisha patil - 10/7/2025 11:24:24 PM
Share This News:



गांजासह इसम अटकेत; एलसीबीची कोतोलीत कारवाई

कोल्हापूर : कोतोली (ता. पन्हाळा) प्रतिनिधी शहाबाज मुजावर परिसरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गांजासह रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून 1 किलो 410 ग्रॅम वजनाचा गांजा आणि इतर साहित्य असा एकूण 1 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कोतोली गावाच्या हद्दीतील फणासकीच्या ओढ्याजवळ एक इसम गांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार सचिन जाधव व अनिकेत मोरे यांना मिळाली. यानंतर पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने सापळा रचून मोटरसायकलवरून आलेल्या इसमाला ताब्यात घेतले.

पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुमित शंकर सातपूते (वय 26, रा. कोतोली, ता. पन्हाळा) असे आहे. त्याच्यावर यापूर्वी दोन गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघड झाले आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार सचिन जाधव, अनिकेत मोरे, अरविंद पाटील, अशोक पोवार, अमित सर्जे, संजय पड़वळ, संजय हुंबे, हिंदुराव केसरे, विलास किरोळकर आणि प्रविण पाटील हंबीररात अतिये यांच्या पथकाने केली.


crime news....गांजासह इसम अटकेत; एलसीबीची कोतोलीत कारवाई
Total Views: 167