बातम्या

शिक्षणासोबत कलागुणांची जोपासना गरजेची” :  खास. धनंजय महाडिक

It is necessary to cultivate talents along with education


By nisha patil - 6/18/2025 9:55:09 PM
Share This News:



शिक्षणासोबत कलागुणांची जोपासना गरजेची” :  खास. धनंजय महाडिक

 वडणगेत मुख्यमंत्री प्रवेशोत्सव उपक्रमात विद्यार्थ्यांचे जल्लोषी स्वागत

वडणगे (ता. करवीर) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील प्रवेशोत्सव उपक्रम अंतर्गत खासदार धनंजय महाडिक यांनी शिवाजी विद्या मंदिर व कन्या विद्या मंदिर या शाळांना भेट दिली.

ढोल-ताशा, लेझीम आणि पारंपरिक वेशभूषेतील स्वागतानंतर विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प, गणवेश, शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. वृक्षारोपण करून शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी करण्यात आली.

यावेळी खासदार महाडिक म्हणाले, "जागतिक स्तरावर स्पर्धा वाढत असताना शिक्षणासोबत संस्कार व कलागुण आवश्यक आहेत. शिक्षकांनी पुढाकार घेतल्यास देश महासत्ता होईल."

या कार्यक्रमात सरपंच संगीता पाटील यांनी सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना घरफाळा व पाणीपट्टीत सवलत जाहीर केली.

उपस्थित मान्यवरांमध्ये उपसरपंच उमाजी शेलार, बाजीराव पाटील, तानाजी पाटील, एम. बी. किडगावकर, इंद्रजित पाटील, सर्जेराव पाटील, कृष्णात जोंदाळ, बाबासाहेब पाटील, रोहित पाटील (सरपंच, चिखली) यांचा समावेश होता. पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शिक्षणासोबत कलागुणांची जोपासना गरजेची” :  खास. धनंजय महाडिक
Total Views: 123