बातम्या
परीक्षेचे गांभीर्य जपून विद्यार्थी घडविणे गरजेचे – प्राचार्य डॉ. कुंभार
By nisha patil - 3/10/2025 4:36:47 PM
Share This News:
परीक्षेचे गांभीर्य जपून विद्यार्थी घडविणे गरजेचे – प्राचार्य डॉ. कुंभार
कोल्हापूर, दि. ३ : विवेकानंद कॉलेजमध्ये ‘परीक्षा व्यवस्थापन : शिक्षकांची जबाबदारी’ या विषयावर आयोजित शिक्षक प्रशिक्षण शिबिरात प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी परीक्षेचे महत्व अधोरेखित करताना म्हटले की,
“परीक्षेचे कामकाज हे महाविद्यालयाचा आत्मा आहे. पारदर्शकतेने व गांभीर्याने परीक्षा पार पाडून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे ही प्रत्येक शिक्षकाची जबाबदारी आहे.”
प्रथम सत्रात –
-
डॉ. जी. जे. नवाथे : प्रश्नपत्रिका ज्ञानात्मक, बोधात्मक व उपयोजनात्मक असाव्यात. परीक्षा विद्यार्थ्याने प्रवेश घेतल्यापासूनच सुरू होते.
-
डॉ. दीपक तुपे : प्रश्नपत्रिका तयार करताना गोपनीयता, पारदर्शकता व पावित्र्य पाळावे.
-
प्रा. एच. व्ही. चामे : पर्यवेक्षकांनी वेळेवर हजर राहून, वर्गात सतत नियंत्रण ठेवून, कॉपीमुक्त परीक्षा घेणे गरजेचे.
दुसऱ्या सत्रात –
-
डॉ. संदीप पाटील : प्रामाणिक मूल्यमापन करून १५ दिवसांत निकाल जाहीर करणे आवश्यक.
-
डॉ. उमेश दबडे : उत्तरपत्रिकांचे योग्य मूल्यांकन महाविद्यालयाच्या नावलौकिकाशी थेट जोडलेले.
-
डॉ. सिध्दार्थ कट्टीमनी : परीक्षा कामकाजात पावित्र्य व गोपनीयता जपली नाही तर लहानशी चूकही महाविद्यालयाला फटका देऊ शकते.
शिबिराचे प्रास्ताविक डॉ. श्रुती जोशी यांनी केले. आभार डॉ. कविता तिवडे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. सुप्रिया पाटील यांनी केले.
या शिबिरास महाविद्यालयातील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परीक्षेचे गांभीर्य जपून विद्यार्थी घडविणे गरजेचे – प्राचार्य डॉ. कुंभार
|