बातम्या

आजच्या विज्ञान युगातही असे अघोरी प्रकार होणे खरोखरच निंदनीय आहे

It is truly condemnable


By nisha patil - 2/12/2025 3:25:04 PM
Share This News:



आजच्या विज्ञान युगातही असे अघोरी प्रकार होणे खरोखरच निंदनीय आहे
 

आजरा(हसन तकीलदार):-आजरा नगरपंचायतीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि कोण कोणाला शह देणार हे आता 21तारखेलाच कळणार असे स्पष्ट संकेत दिले आहेत. निकालाची तारीख पुढे ढकलल्यामुळे तर्क वितर्काना उधाण येत आहे. सोशल मीडियावर अनेक शंका कुशंका प्रसारित केल्या जात आहेत. परंतु अशातच आजऱ्याच्या प्रभाग क्र. 16मध्ये मात्र एक अघोरी प्रकार घडला आहे. याची चर्चा मात्र सर्वत्र होताना दिसत आहे.
     

प्रभाग क्र. 16 मध्ये अघोरी प्रकार घडला आहे. बहुजन मुक्ती पार्टीने अनोखी क्रांती करीत स्टॅम्पपेपरवर जाहीरनामा लिहून घेत दोन उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. आजऱ्याच्या गांधीनगर येथे या जाहीरनाम्याच्या पत्रकावर चारी बाजूला चार दगड ठेऊन मधोमध कापलेला लिंबू ठेवला आहे. विज्ञान युगात असा अघोरी प्रकार निंदनीय आहे. केवळ भीती निर्माण करणे किंवा वात्रटपणा करण्यासाठी जाणूनबुजून हा प्रकार केला असल्याचे बोलले जात आहे.

परंतु आज आम्ही दिलेला जाहीरनामा पाहून विरोधकांनी हा जाणून बुजून प्रकार केला असून आमचा धसका घेतला असल्याचे मत बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी डॉ. उल्हास त्रिरत्ने यांनी सांगितले. जग चंद्रावर चाललंय, मंगळावर पाणी शोधतंय आणि आपल्याकडे लिंबू आणि भानामतीत आपलं अस्तित्व शोधतोय हा खरोखरच दयनीय आणि अशोभनीय प्रकार आहे.


आजच्या विज्ञान युगातही असे अघोरी प्रकार होणे खरोखरच निंदनीय आहे
Total Views: 1182