राजकीय

गोरगरिबांच्या श्रावणबाळाला भेटून मोठा आनंद झाला

It was a great joy to meet the Shravan Bala of the poor


By nisha patil - 10/31/2025 1:11:50 PM
Share This News:



कोल्हापुर:- कोल्हापुरातील कसबा बावडा येथील शासकीय विश्रामगृह म्हणजेच सर्किट हाऊस. आज शुक्रवार दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजीची सकाळी साधारणता आठ वाजताची ही वेळ. तासाभरापूर्वीच मुंबईवरून रेल्वेने आलेले मंत्री हसन मुश्रीफ कोल्हापुरातूनच तयार होऊन थेट ऊत्तूरला निघण्यासाठी लगबगीने भुदरगड या सूटमधून बाहेर पडत होते. त्याचवेळी हिंगोली जिल्ह्यातील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंत्री श्री. मुश्रीफ यांना पाहताच गडबडीने बुके आणि शाल घेऊन जवळ येऊन फोटो काढण्याची विनंती केली.

उत्तुरला वेळेत पोहोचायच्या गडबडीत असतानाही मंत्री श्री.  मुश्रीफ यांनीही आनंदाने घ्या- घ्या फोटो असे म्हणत, चार ते पाच फोटो काढले. फोटो काढतानाच त्यांच्यापैकी वसमत नगरपालिकेचे नगरसेवक सुरेश स्वामी म्हणाले, "साहेब...... गोरगरिबांचे श्रावणबाळ म्हणून आपल्याबद्दल आजपर्यंत बरेच ऐकत आणि वाचत आलो होतो. आज तुम्हाला भेटून मोठा आनंद झाला".  मंत्री श्री. मुश्रीफ यांनीही त्यांना "कुठून आलात, कोल्हापुरात काय काम काढलेत, माझी काही मदत हवी का?" अशी आपुलकीने विचारणा केली. 
        
त्यावर त्या सर्वांनीच उत्तर दिले, आम्ही पहाटे तुळजापूरहून दर्शन घेऊन आलो आणि आता करवीर निवासिनी श्री. अंबाबाईचे दर्शन घेणार आहोत. मंत्री श्री. मुश्रीफ यांनी त्यांना चहा देण्यास सांगितले आणि ते निघून गेले.
        
यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील ॲड. प्रेम स्वामी, वसमत नगरपालिकेचे नगरसेवक सुरेश स्वामी, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत समाजाचे परभणी जिल्हा संपर्कप्रमुख गंगाप्रसाद स्वामी, औंढा नागनाथ तालुक्यातील शिरट शहापूर या ग्रामपंचायतीचे सदस्य कृष्णा नेवल- पाटील आदींचा समावेश होता.


गोरगरिबांच्या श्रावणबाळाला भेटून मोठा आनंद झाला
Total Views: 43