राजकीय

भादवणच्या  विकासासाठी कुठेही कामी पडणार नाही - राजे समरजितसिंह घाटगे

It will not be useful for the development of Bhadwan anywhere Raje Samarjitsinh Ghatge


By nisha patil - 4/5/2026 12:36:21 PM
Share This News:



भादवणच्या  विकासासाठी कुठेही कामी पडणार नाही - राजे समरजितसिंह घाटगे

 

भादवण येथे ई- लर्निंग सेवा लोकार्पण आणि अभ्यासिकाचे उदघाटन व पुरस्कार वितरण सोहळा संपन्


आजरा(हसन तकीलदार) - भादवण गावाने मला राजकीय जीवनात अनेक वेळा साथ दिली आहे. यापुढे भादवण गावच्या विकासासाठी कोठेही कमी पडणार नाही याची ग्वाही समरजीतसिंह घाटगे यांनी येथील कार्यक्रमात दिली. भादवण येथील सरपंच माधुरी गाडे आणि प्रा. रणजित गाडे यांच्या प्रयत्नातून नवचेतना समूहाच्या वतीने आयोजित ई - लर्निंग लोकार्पण सोहळा अभ्यासिका उदघाटन सोहळा व पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते, स्वागत व प्रास्ताविक प्रा. रणजित गाडे यांनी केले, आणि कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला.

 

त्यानंतर बोलताना राजे म्हणाले, भादवण सारख्या गावात ई - लर्निंग आणि अभ्यासिका उभारली या बद्दल गाडे यांचे कौतुक केले, येणारा काळ हा सर्वच बाबतीत संघर्षचा आहे, यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे, यासाठी शेतीत शेतकरी वर्गाने ए-आय तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे, महिला वर्गाने बचत गटाच्या माध्यमातून पुढे यावे त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, महिला वर्गात आरोग्याच्या बाबतीत संकोचपणा  असतो, मात्र असा संकोचपणा  बाळगून आपल्या आरोग्याची हेळसांड करू नये यासाठी राजे फाउंडेशन मार्फत  गावोगावी आरोग्य शिबीर भरविण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला.भादवण येथील शाळा रस्ते आणि आरोग्याच्या बाबतीत शासनाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले, यावेळी आदर्श शिक्षक म्हणून सुभाष सुतार, उत्कृष्ठ शेतकरी म्हणून सुनिल जोशीलकर यांच्यासह कासूबाई पाटील या मूकबधिर महिलेचा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर उत्कृष्ट व्यावसायिक म्हणून दयानंद पोवार यांना नवचेतना ग्रुपच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

 

यावेळी पुरस्कार प्राप्त आणि पोलीस भरती आणि नव्याने निवड झालेल्यांचा सत्कार करण्यात आला,यावेळी पंचायत राज भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत सुतार, संभाजी सरदेसाई, जनार्दन निऊंगरे, आनंदराव कुलकर्णी, सरपंच माधुरी गाडे यांनी मनोगत व्यक्त केले, यावेळी, कार्यक्रमास अशोकआणा चराटी,पंचायत समिती सदस्य समीर पारदे, कारखाना संचालक राजेश जोशीलकर, कानोली सरपंच सुषमा पाटील, सुनिल कुराडे, विकास बागडी,संजय केसरकर, वझरे येथील सरपंच गुरव,अनिल पाटील यांच्यासह मारुती देसाई, आनंदराव जोशीलकर सागर खुळे, सुनिल मुळीक, जितेंद्र गाडे, संदीप सुतार, भिमराव केसरकर, बाळासाहेब कुंभार, जनार्दन उंडगे, विजय गाडे  यांच्यासह ग्रामस्थ आणि महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या, सूत्रसंचालन दिवेकर सर यांनी केले तर आभार सतिश खुळे यांनी मानले..


भादवणच्या  विकासासाठी कुठेही कामी पडणार नाही - राजे समरजितसिंह घाटगे
Total Views: 91