बातम्या

जे.बी. स्पोर्ट्सतर्फे गणेशोत्सवात आरोग्य शिबिर, महापूजा व महाप्रसादाचे आयोजन,

J B  Sports organizes health camp


By nisha patil - 9/21/2026 4:32:17 PM
Share This News:



जे.बी. स्पोर्ट्सतर्फे गणेशोत्सवात आरोग्य शिबिर, महापूजा व महाप्रसादाचे आयोजन,

पन्हाळा प्रतिनिधी,पन्हाळा येथे गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी जे.बी. स्पोर्ट्सच्या वतीने भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिक व गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
       

दिवसभर आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात अनेक नागरिकांनी सहभाग घेतला. तपासणीनंतर गरजेनुसार निदान करून नागरिकांना मोफत औषधोपचार करण्यात आले. यामुळे सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यसेवेचा उपक्रम राबविण्यात आला.
सकाळी श्री सत्यनारायण महापूजा, तर सायंकाळी सुमधुर भजनाचा कार्यक्रम मिलिंद बांदिवडेकर यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर श्री गणपतीची आरती भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.     
         

आरतीस पन्हाळा नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा श्रीमती जयश्री  पवार, माजी नगराध्यक्षा, रूपाली धडेल माजी नगराध्यक्ष श्री. विजय पाटील, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र धडेल, शिवसेनेचे शहराध्यक्ष मारुती माने, नगरसेविका तेजस्विनी गुरव, प्रतीक्षा वराळे, नगरसेवक, प्रदीप गवळी, सखाराम काशीद, तुकाराम भाडेकर, शहाबाज मुजावर, नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री महागणपतीचे दर्शन व आरतीचा लाभ घेतला.
         

यानंतर आयोजित महाप्रसादाचा सुमारे ६०० ते ७०० गणेशभक्तांनी लाभ घेतला. भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संगम घडविणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला. सामाजिक बांधिलकी जपत कार्यक्रम आयोजित केल्यामुळे जे.बी स्पोर्ट्स चे भागात कौतुक होत आहे.
         

कार्यक्रमास सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, गणेशभक्त, नागरिक आणि कार्यकर्त्यांचे जे.बी. स्पोर्ट्सच्या वतीने आभार अक्षय सोरटे व शिवकुमार सोरटे यांनी आभार मानलेत.


जे.बी. स्पोर्ट्सतर्फे गणेशोत्सवात आरोग्य शिबिर, महापूजा व महाप्रसादाचे आयोजन,
Total Views: 86