बातम्या

*जे. पी.नाईक पतसंस्थेची वार्षिक उलाढाल २७५ कोटी

J P Naik Credit Society


By nisha patil - 9/29/2026 8:15:14 PM
Share This News:



*जे. पी.नाईक पतसंस्थेची वार्षिक उलाढाल २७५ कोटी

*१२ टक्के लाभांश; ७५ कोटींच्या ठेवी, ६१ कोटींचे कर्जवाटप

*आजरा(हसन तकीलदार):- शिक्षणतपस्वी जे. पी. नाईक नागरी सहकारी पतसंस्था मर्या., आजरा या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. संस्थेची वार्षिक उलाढाल २७५ कोटी रुपये असून, संस्थेकडे ७५ कोटींच्या ठेवी व ६१ कोटींचे कर्जवाटप आहे. गत आर्थिक वर्षातील व्यवहारातून सभासदांना १२ टक्के लाभांश देण्यात आला असल्याची माहिती अध्यक्ष प्रा. डॉ. शिवशंकर उपासे यांनी दिली.

मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने सभेला सुरुवात झाली. दिवंगत सभासद व देशातील दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्याचा ठराव रवींद्र देसाई यांनी मांडला. अध्यक्ष प्रा. डॉ. उपासे यांनी प्रास्ताविकासह वार्षिक अहवालाचे वाचन केले.

संस्थेने १७ कोटींची गुंतवणूक केली असून दोन कोटींहून अधिक राखीव व इतर निधी आहे. संस्थेचे भागभांडवल १ कोटी ९४ लाख रुपये आहे. संस्थेच्या गडहिंग्लज व कोल्हापूर येथे दोन शाखा कार्यरत आहेत. आजऱ्यासारख्या ग्रामीण भागात २७५ कोटींची वार्षिक उलाढाल गाठणे हे सभासद, ठेवीदार व ग्राहकांचा विश्वास आणि संस्थेच्या पारदर्शक कारभाराचे द्योतक असल्याचे डॉ. उपासे यांनी सांगितले.

सभेत एकसष्टी व पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या सभासदांचा तसेच दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष सुभाष विभुते यांनी ताळेबंद पत्रक, श्रावण जाधव यांनी नफा-तोटा पत्रक, तर शिवाजी बिद्रे यांनी नफा विभागणीचा ठराव मांडला. जादा खर्चास मंजुरीचा ठराव शिवाजी कांबळे यांनी मांडला.

२०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी अंतर्गत व वार्षिक लेखापरीक्षक नेमण्याचे अधिकार संचालक मंडळास देण्याचा ठराव जनरल मॅनेजर संतोष जाधव यांनी मांडला. तसेच शासकीय लेखापरीक्षण अहवालाचे दोष-दुरुस्तीसह वाचनही त्यांनी केले. संचालक मंडळ येणे कर्ज यादीचे वाचन दयानंद उपासे यांनी केले. कोल्हापुर शाखा जागा खरेदी व शाखा विस्तारास मंजुरी घेण्यात आली. एस. एस. देसाई यांनी सभासदांना प्रशिक्षण व मार्गदर्शन केले.

सभेच्या कामकाजात  बळवंत शिंत्रे, विनय फळणीकर, देवदास पाचवडेकर, एकनाथ गिलबिले व किरण कुंभार यांनी सहभाग घेतला. संचालक मंडळाच्या कामकाजाबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.सभेचे नियोजन संजय तेजम, निकीता स्वामी, तुषार येरुडकर, सुभाष पाटील, उत्तम कुंभार, एकनाथ कांबळे व कुणाल गुरव यांनी केले. यावेळी पुष्पलता घोळसे, अजित तोडकर, सुनील पाटील, चंद्रशेखर बंटकडली, प्रकाश ओतारी, रुपाली सातार्डेकर, जाई साळुंखे, संजय कडगावे, मनोज गुंजाटी, मॅनेजर कुरळे व मॅनेजर कोंडुसकर यांच्यासह कोल्हापूर व गडहिंग्लज शाखांच्या सल्लागार मंडळातील सदस्य आणि सभासद उपस्थित होते.
अनिल कांबळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.


*जे. पी.नाईक पतसंस्थेची वार्षिक उलाढाल २७५ कोटी
Total Views: 142