बातम्या

जे. पी. नाईक पतसंस्थेचा गौरव-प्रा. डॉ. शिवशंकर उपासे व संतोष जाधव यांना 'सहकार भूषण पुरस्कार' प्रदान

J P Naik Patsansthas pride


By Administrator - 3/24/2026 6:35:02 PM
Share This News:



जे. पी. नाईक पतसंस्थेचा गौरव-प्रा. डॉ. शिवशंकर उपासे व संतोष जाधव यांना 'सहकार भूषण पुरस्कार' प्रदान
 

आजरा (हसन तकीलदार):- साहित्य शिक्षण परिषद कोल्हापुर 2026 गंगाधर वृत्तपत्रामार्फत सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जे. पी. नाईक पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन प्रा. डॉ. शिवशंकर उपासे सर यांना 'उत्कृष्ट चेअरमन' आणि  संतोष जाधव यांना 'उत्कृष्ट व्यवस्थापक' श्रेणीत सहकार भूषण पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करण्यात आले. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत पतसंस्थेची आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि सभासदाभिमुख सेवा यांची दखल घेऊन हा बहुमान प्रदान करण्यात आला. प्रा. डॉ. उपासे यांच्या दूरदृष्टीमुळे संस्थेने ठेवी आणि कर्ज वाटपात नवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत, तर व्यवस्थापक संतोष जाधव यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना वेगवान सेवा देण्यावर भर दिला आहे.

या यशाबद्दल बोलताना प्रा. डॉ. उपासे सर म्हणाले की, "हा पुरस्कार केवळ आमचा नसून सर्व संचालक मंडळ, कर्मचारी आणि विश्वासू सभासदांच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे." या पुरस्कारामुळे जे. पी. नाईक पतसंस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे


जे. पी. नाईक पतसंस्थेचा गौरव-प्रा. डॉ. शिवशंकर उपासे व संतोष जाधव यांना 'सहकार भूषण पुरस्कार' प्रदान
Total Views: 182