विशेष बातम्या
थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्रासाठी जॅकी श्रॉफ करणार सहकार्य
By nisha patil - 10/18/2025 3:23:41 PM
Share This News:
थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्रासाठी जॅकी श्रॉफ करणार सहकार्य
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची मुंबईत सदिच्छा भेट
प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी मुंबईत राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान “थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र” या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानासाठी जॅकी श्रॉफ यांनी सक्रिय सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली.
जॅकी श्रॉफ हे अनेक वर्षांपासून विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून थॅलेसेमिया या रक्ताच्या आनुवंशिक गंभीर आजाराविषयी समाजात प्रबोधनाचे काम करत आहेत. त्यांनी आता या जनजागृती उपक्रमात शासनाला हातभार लावण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
या भेटीत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, “थॅलेसेमिया या आजारावर मात करण्यासाठी समाजातील सर्व घटक, सेवाभावी संस्था, डॉक्टर्स आणि प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. या उपक्रमाला लोकचळवळीचे स्वरूप मिळाले पाहिजे.”
या वेळी कर्मचारी राज्य रक्त संक्रमण परिषदेचे डॉ. पुरुषोत्तम पुरी, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, गजेन्द्रराज पुरोहित आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्रासाठी जॅकी श्रॉफ करणार सहकार्य
|