बातम्या
प्रा. जालंदर पाटील यांच्या नियुक्तीचा शेतकरी चळवळीस मोठा फायदा – आमदार राजेश क्षीरसागर
By nisha patil - 1/9/2025 4:12:35 PM
Share This News:
प्रा. जालंदर पाटील यांच्या नियुक्तीचा शेतकरी चळवळीस मोठा फायदा – आमदार राजेश क्षीरसागर
कोल्हापूर (दि. ३०) : शिवसेना अंगिकृत शेतकरी सेनेच्या प्रदेशाध्यक्ष पदी प्रा. जालंदर पाटील आणि सचिव पदी जनार्दन पाटील यांची नुकतीच नियुक्ती झाली. या नियुक्तीबद्दल आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार क्षीरसागर म्हणाले की, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी बांधवांच्या न्यायहक्कासाठी शेतकरी सेनेची स्थापना केली आहे. प्रा. जालंदर पाटील हे उच्चशिक्षित असून गेली २५ वर्षे संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी समस्यांवर अभ्यासू वक्ता म्हणून झटत आहेत. त्यांच्या अनुभवाचा शेतकरी चळवळीस नक्कीच फायदा होईल.”
त्यांनी पुढे सांगितले की, एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या प्रा. पाटील यांच्या नेतृत्वामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे जलद निवारण होण्यास मदत होईल. यावेळी प्रा. जालंदर पाटील आणि सचिव जनार्दन पाटील यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रा. जालंदर पाटील यांच्या नियुक्तीचा शेतकरी चळवळीस मोठा फायदा – आमदार राजेश क्षीरसागर
|