बातम्या
“कोल्हापूरात राज्य महोत्सवाच्या निमित्ताने रंगला ‘जल्लोष माय मराठीचा’
By nisha patil - 5/9/2025 3:07:24 PM
Share This News:
“कोल्हापूरात राज्य महोत्सवाच्या निमित्ताने रंगला ‘जल्लोष माय मराठीचा’
महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा बहारदार प्रवास लोककलेतून सादर ..
५० हून अधिक कलाकारांनी शाहू गौरव गीत, गणेश वंदना, मंगळागौर, पोवाडा, भारुड, मर्दानी खेळ अशा अस्सल मराठमोळ्या सादरीकरणांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यांनी सांगितले की गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून समाजाला दिशा देणारे प्रभावी माध्यम आहे. राज्य महोत्सवातील सांस्कृतिक व प्रबोधनपर उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडवतात, असेही त्यांनी नमूद केले.
लोककलेतून सामाजिक संदेश आणि मराठी संस्कृतीचा वारसा जपणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरला.”
“कोल्हापूरात राज्य महोत्सवाच्या निमित्ताने रंगला ‘जल्लोष माय मराठीचा’
|