राजकीय

पन्हाळ्यातून जनसुराज्य पक्षाचे ज्येष्ठ दानशूर फक्रुद्दीन मुजावर निवडणुकीच्या रिंगणात

Janasurajya Party's senior donor Fakhruddin Mujawar


By nisha patil - 6/11/2025 2:05:08 PM
Share This News:



पन्हाळा (शहाबाज मुजावर):- पन्हाळा नगरपरिषद क्षेत्रातील एक ओळखलेलं आणि समाजसेवेच्या माध्यमातून लोकांच्या मनात स्थान मिळवलेलं नाव म्हणजे हाजी. फक्रुद्दीन कुतबुद्दीन मुजावर. कोल्हापूर चिकन असोसिएशनचे अध्यक्ष आणि पन्हाळा नगरपरिषदेतील ट्री कमिटीचे सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी आपल्या कामातून ठसा उमटवला आहे.

सावकार चषक या भव्य आणि प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यामागे त्यांचा पुढाकार राहिला आहे. तसेच कोरोना काळात त्यांनी स्वतःच्या टेम्पोमधून गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून मानवी संवेदनशीलतेचा आदर्श ठेवला.

हाजी मुजावर हे जनसुराज्य पक्षाकडून इच्छुक उमेदवार असून त्यांनी अनेक वर्ष या पक्षाची निष्ठेने सेवा केली आहे. सर्वसामान्यांना सहकार्य करणे, आर्थिक अडचणीत असणाऱ्यांना मदत करणे, सामाजिक व धार्मिक उपक्रमात सहभाग घेणे हे त्यांचे जीवनधर्म झाले आहे.

प्रामाणिकपणा, संयम, दानशूर वृत्ती आणि माणुसकी — या गुणांनी नटलेले फक्रुद्दीन मुजावर हे पन्हाळ्याच्या नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांनी पावनगडच्या विकासासाठी अनेक प्रयत्न केले असून, समाजहिताचा ध्यास घेतलेले हे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आजही तितक्याच जोमाने कार्यरत आहे.



पन्हाळ्यातून जनसुराज्य पक्षाचे ज्येष्ठ दानशूर फक्रुद्दीन मुजावर निवडणुकीच्या रिंगणात
Total Views: 37