बातम्या

मराठा आरक्षण आंदोलनाला जनसुराज्य शक्तीचा जाहीर पाठींबा...

Janasurajya Shaktis public support


By nisha patil - 8/30/2025 3:39:58 PM
Share This News:



मराठा आरक्षण आंदोलनाला जनसुराज्य शक्तीचा जाहीर पाठींबा...

मराठा आरक्षण ही काळाची गरज' – डॉ. कोरे

जनसुराज्य शक्तीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विनय वि. कोरे (सावकर) यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. "संस्कार, संकल्प आणि सिद्धी" या ब्रीदवाक्याने कार्यरत असलेली जनसुराज्य शक्ती पक्षाने समाजाच्या हक्कासाठी उभ्या राहण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
 

डॉ. कोरे म्हणाले, "मराठा समाज शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची नितांत गरज आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी आरक्षणासाठी उभे केलेल्या आंदोलनाला जनसुराज्य शक्तीचा ठाम पाठिंबा आहे."


मराठा आरक्षण आंदोलनाला जनसुराज्य शक्तीचा जाहीर पाठींबा...
Total Views: 83