बातम्या

*जनता सहकारी गृहतारण संस्थेची दीपावली पाडव्याला ७ शाखांमध्ये ३ कोटी ४ लाख १५ हजारांचे ठेवी संकलन

Janata Sahakari Gruhataran Sanstha


By nisha patil - 10/11/2026 8:18:01 PM
Share This News:



*जनता सहकारी गृहतारण संस्थेची दीपावली पाडव्याला ७ शाखांमध्ये ३ कोटी ४ लाख १५ हजारांचे ठेवी संकलन

*आजरा(हसन तकीलदार):- दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर जनता सहकारी गृहतारण संस्था मर्यादित, आजरा या अग्रगण्य संस्थेने आर्थिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत एकाच दिवसात तब्बल ३ कोटी ४ लाख १५ हजार रुपयांच्या विक्रमी ठेवी संकलन केले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष मारुती मोरे यांनी दिली.

दिवाळी पाडव्यानिमित्त संस्थेच्या एकूण ७ शाखांमध्ये ग्राहकांनी व ठेवीदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये आजरा, गडहिंग्लज, कोल्हापूर, गारगोटी, इचलकरंजी, सांगली आणि पाटणे फाटा (ता. चंदगड) या सर्व शाखांमधून मोठ्या प्रमाणावर ठेवी जमा झाल्या आहेत. संस्थेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल बोलताना अध्यक्ष  मारुती मोरे म्हणाले, "संस्थेच्या संचालक मंडळाचे मार्गदर्शन, मुख्य कार्यालय संचालक मंडळ, सर्व शाखांचे चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक मंडळ तसेच अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांनी घेतलेली मेहनत यामुळेच हे यश शक्य झाले आहे." त्यांनी या सर्व सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले असून, संस्थेवर विश्वास ठेवून ठेवी ठेवणाऱ्या सर्व ठेवीदारांचे आभार व्यक्त केले.

ग्राहकांच्या विश्वासावर आणि माणसं जोडणारी संस्था म्हणून ओळख असणारी संस्था यापुढील काळातही असेच उत्तम वित्तीय सेवा देत राहील, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला आहे.


*जनता सहकारी गृहतारण संस्थेची दीपावली पाडव्याला ७ शाखांमध्ये ३ कोटी ४ लाख १५ हजारांचे ठेवी संकलन
Total Views: 21