खेळ
शिरगावमध्ये प.पू. बालदास महाराजांच्या १५० व्या पुण्यतिथीनिमित्त जंगी कुस्ती मैदान;
By nisha patil - 11/23/2025 2:02:10 PM
Share This News:
शिरगाव (ता. शाहूवाडी) येथे प.पू. बालदास महाराज सेवा ट्रस्टतर्फे प.पू. योगीराज बालदास महाराज यांच्या १५० व्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथीनिमित्त भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान उत्साहात आयोजित करण्यात आले.
या कुस्ती स्पर्धेला आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी भेट देऊन कुस्तीपटूंच्या खेळीला उत्साहवर्धन केले.
कार्यक्रमाच्या वेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरिडकर), ट्रस्टचे अध्यक्ष रंगराव खोपडे, कोल्हापूर शेतकरी संघाचे संचालक सुभाष जामदार, बांबवडे माजी सरपंच विष्णू यादव, तसेच बाबा काटकर, संतोष भिंगले, संभाजी भोसले, रविंद्र यादव, जी.एम. पाटील, पी.एस. पाटील, संपत पाटील, जयवंत पाटील, मारुती पाटील यांच्यासह मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जंगी मैदानातील जोरदार कुस्ती सामने, गावाच्या परंपरेला साजेसा उत्साह आणि मान्यवरांचे मार्गदर्शन यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
शिरगावमध्ये प.पू. बालदास महाराजांच्या १५० व्या पुण्यतिथीनिमित्त जंगी कुस्ती मैदान;
|