मनोरंजन

वाढदिवशी जान्हवी किल्लेकरची मोठी घोषणा! ‘कुकाई’ चित्रपटातून करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण

Janhvi Killekars big announcement

By nisha patil - 12/10/2026 3:01:56 PM
Share This News:

वाढदिवशी जान्हवी किल्लेकरची मोठी घोषणा! ‘कुकाई’ चित्रपटातून करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण
 
कोल्हापूर प्रतिनिधी अजित बोडके कोल्हापूर : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने आपल्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं आहे. अभिनेत्री म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर आता तिने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

जान्हवी तिच्या ‘जान्हवी प्रॉडक्शन’ या निर्मिती संस्थेद्वारे आगामी मराठी भयपट ‘कुकाई’ मध्ये प्रथमच सहनिर्माती म्हणून पदार्पण करत आहे.

‘कुकाई’ या चित्रपटाची घोषणा नुकतीच घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आली होती. या चित्रपटात मराठीतील सुपरस्टार अंकुश चौधरी पहिल्यांदाच भयपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे या घोषणेने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.  

वाढदिवशी जान्हवी किल्लेकरची मोठी घोषणा! ‘कुकाई’ चित्रपटातून करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण
Total Views: 25