बातम्या
‘जय श्रीराम’च्या जयघोषात राजारामपुरीत सौ. जस्मिन आजम जमादार यांच्या प्रचाराचा उत्साहात शुभारंभ
By nisha patil - 12/20/2025 2:56:09 PM
Share This News:
‘जय श्रीराम’च्या जयघोषात राजारामपुरीत सौ. जस्मिन आजम जमादार यांच्या प्रचाराचा उत्साहात शुभारंभ
कोल्हापूर : प्रभाग क्रमांक १५ मधील भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवार सौ. जस्मिन आजम जमादार यांच्या प्रचाराचा आज ‘जय श्रीराम’च्या जयघोषात उत्साहपूर्ण शुभारंभ झाला. सकाळी दहा वाजता मारुतीरायाचे दर्शन घेऊन प्रचाराला प्रारंभ करण्यात आला.
.%5B4%5D.jpg)
राजारामपुरी परिसर भगवामय झाला असून महिला, युवक, ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. ओबीसी महिला प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या सौ. जस्मिन जमादार यांच्या प्रचारामुळे परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.
.%5B4%5D.jpg)
राजारामपुरी ११ वी गल्ली ते साईक्स एक्स्टेंशन परिसरात काढण्यात आलेल्या पदयात्रेदरम्यान त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत समस्या जाणून घेतल्या व आशीर्वाद स्वीकारले. या प्रचार पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
.%5B6%5D.jpg)
या वेळी पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक व महिला मंडळांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचार शुभारंभाचे संयोजन आगरवाल, दिलीप बोंद्रे, सागर केंगारे व ओंकार घाटगे यांनी केले.
‘जय श्रीराम’च्या जयघोषात राजारामपुरीत सौ. जस्मिन आजम जमादार यांच्या प्रचाराचा उत्साहात शुभारंभ
|