बातम्या

जवाहर पतसंस्थेतर्फे यशवंत गुणवंतांचा यथोचित सत्कार

Javhar patsanstha


By nisha patil - 5/26/2026 2:06:47 PM
Share This News:



**जवाहर पतसंस्थेतर्फे यशवंत गुणवंतांचा यथोचित सत्कार*

केवळ सत्कार नको तर पुढील मार्गदर्शनाचीही गरज-शहानवाज मुल्ला*

आजरा(हसन तकीलदार)*:-आजऱ्यातील नामांकित जवाहर नागरी सह. पत संस्थेमार्फत विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या यशवंत गुणवंतांचा सत्कार समारंभ नुकताच संस्थेच्या सिलेमानशेठ दिडबाग हॉल मध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन इकबाल शेख होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे व्यवस्थापक बशीर काकतिकर यांनी केले तर प्रास्ताविक समीर चांद (सर )यांनी केले.

या सत्कार समारंभात उर्दू हायस्कुल, पंडित दीनदयाळ, व्यंकटराव हायस्कुल, रोझरी हायस्कुल आणि अण्णा भाऊ मधील 10 विच्या परीक्षेत पाहिल्या पाच मध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महंमदसमी रिजवान पटेल याने पोलीस भरतीत यश संपादन केलेबद्दल व बिलाल लतीफ यांची शिवसेना उबाठाच्या कामगार सेना शहर अध्यक्षपदी निवड झालेबद्दल सत्कार करण्यात आला.

   शहानवाज मुल्ला(प्राथमिक शिक्षक)यांनी मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली तर मुलांचे भविष्य उज्वल आहे. मागील पिढी पुढे गेली नव्हती. तत्सम व्यवसाय करून त्यांनी आपले आयुष्य ढकलले परंतु आजच्या पिढीला जर अशा पद्धतीने प्रेरणा दिली तर विविध क्षेत्रामध्ये ही पिढी चमकणार आहे. समाजातील इतरही काही जण शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर आहेत अशांना सुद्धा प्रेरणा मिळणार आहे. त्यांनाही शिक्षणाची गोडी निर्माण होणार आहे. जे विद्यार्थी चांगले गुण घेऊन यशस्वी झालेले आहेत त्यांचा केवळ सत्कारच करून चालणार नाही तर त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचे करिअर आणि भविष्याचे मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. जे विद्यार्थी जास्त गुण मिळवलेत त्यांना केवळ महाविद्यालयीन शिक्षण देऊन चालणार नाही तर अकॅडमीमध्ये प्रवेश मिळवून देऊन स्पर्धा परीक्षेत गवसणी घालण्याची संधी निर्माण करून दिली पाहिजे. यासाठी आपण केवळ सत्कार करून चालणार नाही तर त्यांना पुढे मार्गदर्शनही करूया असे सांगितले.

   यावेळी रुकसाना नसरदी, शबनम मुल्ला, इलियास तकीलदार, असलम लमतुरे, असिफ सोनेखान(नगरसेवक), तौफिक आगा, असिफ दरवाजकर, बशीर इंचनाळकर, गणी मुल्ला, इकबाल दरवाजकर, अब्दुलरशीद खेडेकर, बशीर मुजावर, अब्दुलरशीद पठाण, इसाक नेसरीकर याबरोबरच मान्यवर सभासद, हितचिंतक तसेच कर्मचारी उपस्थित होते.आभार इस्माईल बेपारी (सर)यांनी मानले.


जवाहर पतसंस्थेतर्फे यशवंत गुणवंतांचा यथोचित सत्कार
Total Views: 658