बातम्या
*जवाहर पत संस्थेची 55 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
By nisha patil - 9/23/2026 4:35:19 PM
Share This News:
*जवाहर पत संस्थेची 55 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
*यशवंत गुणवंतांचा यथोचित सत्कार
*आजरा(हसन तकीलदार):-जवाहर नागरी सह. पत संस्थेची 55 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सुलेमानशेठ दीडबाग सभागृहात अगदी खेळीमेळीत संपन्न झाली.सुरवातीला अहवाल सालात दिवंगत झालेले सभासद त्यांचे नातेवाईक, भारतीय सेनेतील वीर जवान, सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये बळी पडलेल्याना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन इकबाल शेख होते तर स्वागत व प्रास्ताविक समीर चांद यांनी केले. प्रास्ताविकात समीर चांद म्हणाले की, लवकरच आपली संस्था ही जिल्हा पातळीवर काम करेल. यासाठी व्यवस्थापक बशीर काकतिकर काम करीत असलेबद्दल सांगितले. सभासदांच्या योगदानमुळेच संस्थेची प्रगती होत आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
अहवाल वाचन हाफिज भडगावकर यांनी केले यावेळी त्यांनी संस्थेचा ताळेबंद, नफा तोटा पत्रक तसेच विषयांचे वाचन केले. त्यास उपस्थितानी मंजुरी दिली.संस्थेचे जिल्हा कर्यक्षेत्र वाढीस यावेळी मंजुरी देण्यात आली. अहवाल सालात 33,50,930/-₹ इतका नफा झाला असून मागील वर्षापेक्षा 5,02,517/-₹ इतका जास्त नफा झाला असल्याचे सांगितले.
यावेळी जेष्ठ सभासदांच्या हस्ते सलमान शौकत दीडबाग याची सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहात औषध निर्माण अधिकारी म्हणून निवड झालेबद्दल, सफवान अबूतालिब इप्पेरी याने बी. एस्सी. ऍनिमेशन मध्ये शिवाजी विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवले बद्दल तर कुमारी सुहाना इकबाल हिंग्लजकर हिने मथुरा उत्तरप्रदेश येथे झालेल्या नॅशनल गेम्स मध्ये सांघिक कबड्डी मध्ये सुवर्ण पदक मिळवलेबद्दल मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी कैयुम बुड्डेखान यांनी संचालक मंडळ व कर्मचारी यांनी संस्थेच्या प्रगतीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कर्मचारी व संचालक मंडळाच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्याची मागणी केली. तर देवीदास पाचवडेकर यांनी संस्थेसाठी योगदान देणाऱ्या जेष्ठ सभासदांचा संस्थेमार्फत सत्कार करण्याची मागणी केली त्याचप्रमाणे थकबाकी जास्त राहीलेली असल्याचे निदर्शनास आणत एव्हडी थकबाकी संस्थेला घातक असल्याचे नमूद केले व थकबाकी वसुलीस प्रधान्य देण्याची सूचना केली.त्याचप्रमाणे लाभांश वाढ करावी अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
शेवटी इस्माईल बेपारी यांनी आभार मानले. यावेळी व्हा. चेअरमन सौ. रुखसाना नसरदी, संचालक आसिफ सोनेखान, तौफिक आगा,इलियास तकीलदार, आसिफ दरवाजकर, असलम लमतुरे, सौ. शबनम मुल्ला यांचेसह संस्थेचे सभासद, कर्मचारी आदिजण उपस्थित होते.
*जवाहर पत संस्थेची 55 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
|