बातम्या
जयंत पाटील यांचा शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
By nisha patil - 12/7/2025 3:27:29 PM
Share This News:
जयंत पाटील यांचा शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
पाटलांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी १० जूनला पक्षाच्या वर्धापन दिनीच आपल्या राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली होती. ‘‘पवार साहेबांनी मला सात वर्षे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. आता नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी,’’ अशी भूमिका त्यांनी मांडली होती.
जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांनी नवा प्रदेशाध्यक्ष घोषित करत शशिकांत शिंदे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे. शिंदे यांच्या निवडीमुळे पक्षात नव्या दमाच्या नेतृत्वाला चालना मिळणार असल्याचे बोलले जात आहे. जयंत पाटील यांनी आपल्या निर्णयामुळे पक्षातील नेतृत्व पिढीपरिवर्तनाला चालना मिळावी, असा आशय व्यक्त केला होता.
मात्र पक्षातील बदलामुळे आगामी काळात राजकीय समीकरणे कशी बदलतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
जयंत पाटील यांचा शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
|