बातम्या
आधुनिक भारतीय खगोलशास्त्राचे शिल्पकार डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन
By nisha patil - 5/20/2025 2:15:17 PM
Share This News:
आधुनिक भारतीय खगोलशास्त्राचे शिल्पकार डॉ. जयंत नारळीकर यांचे निधनजयंत नारळीकर यांचे निधन
वयाच्या ८७व्या वर्षी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
पुणे, २० मे – आधुनिक भारतीय खगोलशास्त्राचे उद्गाते, ज्येष्ठ साहित्यिक आणि विज्ञान प्रसारक डॉ. जयंत विष्णू नारळीकर (वय ८७) यांचे मंगळवारी (२० मे २०२५) पहाटे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने वैज्ञानिक, शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
डॉ. नारळीकर यांनी ‘आयुका’ (IUCAA) संस्थेची स्थापना करून भारतात खगोलशास्त्राच्या संशोधनाला नवे परिमाण दिले. 'क्वासी स्टेडी स्टेट थिअरी' या विश्वनिर्मितीविषयक संकल्पनेमुळे ते आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातकीर्त झाले. विज्ञानप्रसारासाठी त्यांनी लिहिलेली पुस्तके व लेख आजही विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरतात.
‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’, ‘महाराष्ट्र भूषण’ अशा अनेक सन्मानांनी गौरवलेले डॉ. नारळीकर यांचे योगदान देशासाठी अमूल्य ठरले आहे.
डॉ. नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
आधुनिक भारतीय खगोलशास्त्राचे शिल्पकार डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन
|