ताज्या बातम्या
जयसिंगराव ढेरे यांचे निधन
By nisha patil - 10/17/2025 6:10:50 PM
Share This News:
जयसिंगराव ढेरे यांचे निधन
कोल्हापूर, दि. १७ : जाधववाडी येथील जयसिंगराव ज्ञानु ढेरे (वय ७८) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी काही काळ भारतीय सैन्यात सेवा बजावली असून नंतर भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) मध्येही कार्यरत होते.
ते शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे यांचे वडील होत. त्यांच्या निधनाने ढेरे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ, भावजय, मुली, सुना आणि नातवंडे असा आप्तस्वकीय परिवार आहे.
रविवारी (दि. १९) सकाळी ८.३० वाजता बापट कॅम्प स्मशानभूमी येथे रक्षा विसर्जन करण्यात येणार आहे.
जयसिंगराव ढेरे यांचे निधन
|