ताज्या बातम्या
जयसिंगपूरचा उमदा कलाकार धनंजय पुण्यातील अपघातात कायमचा हरपला
By nisha patil - 11/14/2025 1:16:47 PM
Share This News:
जयसिंगपूर शहरातील तरुण मराठी नाटक कलाकार धनंजय कुमार कोळी यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुण्यात नवले ब्रिज परिसरात झालेल्या अपघातात केवळ २५ वर्षांच्या धनंजय कोळी यांचा मृत्यू झाला.
दत्त मंदिर मागील पहिली गल्ली येथे राहणारा हा तरुण कला क्षेत्रात सक्रिय असून नाटकातील भूमिकांमुळे त्याने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. पुण्यात तो व्यवसायासोबत नाट्यक्षेत्रातही काम करत होता.
अपघाताची बातमी कळताच कुटुंबीयांनी तात्काळ पुण्याकडे धाव घेतली. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील असा परिवार असून अचानक झालेल्या या दुःखद घटनेमुळे जयसिंगपूरमध्ये शोककळा पसरली आहे.
जयसिंगपूरचा उमदा कलाकार धनंजय पुण्यातील अपघातात कायमचा हरपला
|