बातम्या
मुंबई ते कोल्हापूर प्रवासात महिला हँडबॅगेतील ७ तोळ्यांचे दागिने चोरी; साडेचार लाखांचा फटका
By nisha patil - 10/16/2025 4:45:34 PM
Share This News:
मुंबई ते कोल्हापूर प्रवासात महिला हँडबॅगेतील ७ तोळ्यांचे दागिने चोरी; साडेचार लाखांचा फटका
कोल्हापूर – मुंबईच्या बोरीवली येथून कोल्हापूरच्या भाऊसिंगजी रोडवर जात असताना महिलेच्या हँडबॅगेतील सात तोळ्यांचे दागिने चोरीला गेल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी घडली.
मयूर पाष्टे (वय २९, बोरीवली ईस्ट) यांनी १४ ऑक्टोबर रोजी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पाष्टे यांनी सांगितले की, २७ सप्टेंबरच्या रात्री कुटुंबासह खासगी ट्रॅव्हल्समधून कोल्हापूरला निघाल्यानंतर भाऊसिंगजी रोडवरील हॉटेलमध्ये थांबल्यानंतर त्यांना हँडबॅगेतील प्लास्टिकच्या दोन डब्यांमध्ये ठेवलेली साडेचार लाखांची दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले.
चोरीतील दागिन्यांमध्ये चार तोळ्यांचे मंगळसूत्र, एक तोळ्याचा नेकलेस, एक तोळ्याचे कानातील टॉप्स आणि एक तोळ्याचे झुमके यांचा समावेश होता. पाष्टे यांनी ट्रॅव्हल्स आणि घरात शोध घेतला तरी दागिने सापडले नाहीत. पोलिस घटनास्थळी तपास सुरू केला आहे.
मुंबई ते कोल्हापूर प्रवासात महिला हँडबॅगेतील ७ तोळ्यांचे दागिने चोरी; साडेचार लाखांचा फटका
|