बातम्या
भागीरथी संस्थेतर्फे झिम्मा फुगडी स्पर्धा जल्लोषात संपन्न
By nisha patil - 9/17/2025 5:43:14 PM
Share This News:
भागीरथी संस्थेतर्फे झिम्मा फुगडी स्पर्धा जल्लोषात संपन्न
दहा हजार महिलांचा उत्साह : भागीरथी झिम्मा फुगडी स्पर्धा जल्लोषात
भागीरथी महिला संस्थेतर्फे आणि खासदार महोत्सवांतर्गत आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धा महासैनिक दरबार हॉल येथे प्रचंड उत्साहात पार पडली. सुमारे दहा हजार महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत लोककला व खेळांचे अप्रतिम दर्शन घडवले.
उद्घाटन सोहळ्याला महाडिक कुटुंबीयांसह अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या. दरम्यान सुप नाचवणे, फुगडी, उखाणे, घागर घुमवणे यांसारख्या पारंपरिक खेळांच्या रंगात महिलांनी जल्लोष केला.
स्पर्धेला अनेक मराठी मालिकांतील कलाकारांनी हजेरी लावत महिलांना प्रोत्साहन दिले. खासदार धनंजय महाडिक, अध्यक्ष विश्वराज महाडिक आणि युवानेता कृष्णराज महाडिक यांनीही उपस्थित राहून स्पर्धेची शोभा वाढवली. महिला सहभाग, कलाकारांची उपस्थिती आणि उत्तम नियोजनामुळे यंदाची स्पर्धा अविस्मरणीय ठरली
भागीरथी संस्थेतर्फे झिम्मा फुगडी स्पर्धा जल्लोषात संपन्न
|