बातम्या

देवगड आगारात पाच नव्या ‘जिजाऊ’ बसांचे लोकार्पण; एसटी प्रवासाला प्राधान्य देण्याचे आवाहन..

Jijau bus


By nisha patil - 6/27/2026 4:21:21 PM
Share This News:



देवगड आगारात पाच नव्या ‘जिजाऊ’ बसांचे लोकार्पण; एसटी प्रवासाला प्राधान्य देण्याचे आवाहन..

सिंधुदुर्ग ✒️गवस शुभम :देवगड एसटी आगाराला प्राप्त झालेल्या पाच नव्या ‘जिजाऊ’ बसांचे लोकार्पण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. फीत कापून बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच नव्या बसांचे विधिवत पूजनही करण्यात आले.

लोकार्पणानंतर पालकमंत्री राणे यांनी बसांची पाहणी करून प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ कटिबद्ध असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एसटी ही जीवनवाहिनी असून अधिकाधिक नागरिकांनी खासगी वाहनांऐवजी एसटी बससेवेचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी एसटी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना प्रवाशांना वेळेवर, विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. देवगड आगारात दाखल झालेल्या या पाच नव्या ‘जिजाऊ’ बसांमुळे तालुक्यातील प्रवाशांना अधिक चांगली आणि आधुनिक परिवहन सेवा उपलब्ध होणार असून प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

कार्यक्रमास माजी आमदार अजित गोगटे, एसटी विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या बसांच्या समावेशामुळे देवगड आगाराच्या सेवाक्षमतेत वाढ होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


देवगड आगारात पाच नव्या ‘जिजाऊ’ बसांचे लोकार्पण; एसटी प्रवासाला प्राधान्य देण्याचे आवाहन..
Total Views: 19