ताज्या बातम्या
आंदोलनाच्या मंडपात साजरी केली राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती
By nisha patil - 1/13/2026 4:35:39 PM
Share This News:
आजरा (हसन तकीलदार ):-निर्धार नव्या लढ्याचा!हुकूमशाहीला मोडण्यासाठी !!
दप्तर दिरंगाई थांबवून फेर चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करा!या संविधानिक मागण्या घेऊन भुदरगड तहसील समोर सुरु असलेले आठव्या दिवशीचे आंदोलन 12 जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड शिवाजी मगदूम यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आंदोलनाच्या मंडपात जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते कृष्णा भारतीय,सारिका देवेकर,सरस्वती पाटील, रंजना पाटील, गीता पाटील, पूजा पाटील, शकुंतला जाधव,पारूबाई पाटील, बयाबाई पाटील, मीना पाटील, धनाजी शेटके, सुनील जाधव, कृष्णा शेळके यांच्यासह अखिल भारतीय किसान सभेचे समन्वयक संग्राम सावंत उपस्थित होते.
आज आंदोलनाचा आठवा दिवस या आठव्या दिवशी कारभारात झालेली दप्तर दिरंगाई याची चौकशी व्हायला पाहिजे. ग्राम संघाच्या मीटिंगमध्ये आरळगुंडी येथे कायदा हातात घेऊन दोन ते तीन तास कर्मचाऱ्यांना मंदिरात कोंडून घालणाऱ्या व सीआरपी यांना दमदाटी देणाऱ्या सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे.तसेच उमेद अभियानाचा फेरचौकशी अहवाल मिळाला पाहिजे उमेद अभियान दिलेला अहवाल हा बेकायदेशीर व चुकीचा आहे सत्यता न तपासता व पुरावे न तपासता दिलेला अहवाल आहे याबाबत गट विकास अधिकारी पंचायत समिती भुदरगड व तालुका व्यवस्थापक उमेद अभियान यांना अखिल भारतीय किसान सभा व सीआरपी सारिका विनोद देवेकर आरळगुंडी यांच्यावतीने निवेदन देण्यात आलेले आहे.यामध्ये पुढे म्हटले आहे की,
पालकमंत्री प्रकाश आबिटकर न्याय देणार का नाहीत?असा सवाल आमचा आहे.
जिजाऊ जयंती दिवशी कॉम्रेड शिवाजी मगदूम (सेक्रेटरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष) हे म्हणाले की, जोपर्यंत न्याय मिळत नाही. तोपर्यंत हा लढा तुम्ही सुरू ठेवा. आम्ही तुमच्याबरोबर नेहमी असणार आहोत. ही लढाई आपण वाढवत घेऊन जायचे आहे. असा इशारा त्यांनी आंदोलनाच्या स्थळी बोलताना दिला.
या आंदोलनाला युवा वंचित आघाडीचे राज पाटील, सचिन कांबळे, कॉम्रेड रमेश निर्मळे,कॉम्रेड सम्राट मोरे, सी. पी. एम. राधानगरी सेक्रटरी कॉम्रेड दिनकर आदमापुरे, माजी जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा एस.व्ही. ऐनीकर, सुधाकर शिंदे, गारगोटी शहर काँग्रेस कार्याध्यक्ष गजानन चव्हाण,. वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष संदीप भोपळे, नंदकुमार गडकर,संजय देसाई यांच्यासह आरळगुंडी ग्रामस्थ पांडुरंग कातकर, शिवाजी पाटील, अमोल पाटील भारताबाई तोरस्कर, सविता मोरसे यांनी पाठींबा दिला.यावेळी
ॲड.दशरथ दळवी,मेघाराणी भाईंगडे ,धनाजी शेटके, युवराज पाटील, मारूती पाटील,उत्तम कांबळे,सुनिल जाधव, दयानंद पाटील, विनोद देवेकर,गीता पाटील, शाहूबाई देवेकर, मीना पाटील,बयाबाई पाटील, कृष्णा शेटके,रंजना पाटील, मारूती पाटील,अश्विनी कांबळे, सुप्रिया पाटील, पुजा पाटील व आरळगुंडी ग्रामस्थ आदिजण उपस्थित होते.
आंदोलनाच्या मंडपात साजरी केली राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती
|