बातम्या

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांचे मतदान 7 फेब्रुवारीला, मतमोजणी 9 फेब्रुवारीला

Jilha parishad 2r


By nisha patil - 1/29/2026 10:49:01 PM
Share This News:



जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांचे मतदान 7 फेब्रुवारीला, मतमोजणी 9 फेब्रुवारीला

मुंबई, दि. 29 :उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने 12 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल केला आहे.

पूर्वनियोजित 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणारे मतदान आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात येणार असून, मतमोजणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. मतदान सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी 13 जानेवारी 2026 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. नामनिर्देशन, छाननी, माघार व चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता मतदान, मतमोजणी व निकाल जाहीर करणे हे टप्पे शिल्लक आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीसाठी 31 जानेवारीनंतर दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. या कालावधीचा विचार करून सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. संबंधित जिल्हाधिकारी 31 जानेवारी 2026 रोजी सुधारित निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करतील.

मतमोजणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जातील.


जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांचे मतदान 7 फेब्रुवारीला, मतमोजणी 9 फेब्रुवारीला
Total Views: 13