बातम्या

बांधकाम कामगारांना इस्राईलमध्ये नोकरीची संधी

Job opportunities for construction workers in Israel


By nisha patil - 11/20/2025 4:21:37 PM
Share This News:



बांधकाम कामगारांना इस्राईलमध्ये नोकरीची संधी

कोल्हापूर, दि. 20 : इस्राईलमध्ये कुशल बांधकाम कामगारांसाठी 2600 जागा भरावयाच्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे Plastering Work (1000 जागा), Ceramic Tiling (1000 जागा), Drywall Worker (300 जागा), Mason (300 जागा), इत्यादी विविध ट्रेंडसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 
 

या पदासाठी साठी 25 ते 50 वर्षे वयोगटातील अर्जदार नोकरीसाठी अर्ज करु शकतात. उमेदवार किमान 10 वी पास असावा. त्याला इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे. कामगाराला किमान एक वर्ष ते कमाल पाच वर्षांच्या नोकरीसाठी अनिवार्य करारावर स्वाक्षरी करावी लागेल. तसेच त्यांना कामाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असावा. त्याचप्रमाणे इस्राईलमध्ये पूर्वीचा रोजगाराचा इतिहास नसावा. अर्जदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने यापूर्वी इस्राईलमध्ये काम केलेले नसावे.
 

इस्राईलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी महाराष्ट्रातच निवड प्रक्रिया व नियुक्तीचे वाटप, आरोग्य तपासणी, व्हिजा आणि पासपोर्टसाठी संपूर्ण मार्गदर्शन व मदत विभागाकडून केली जाणार आहे. मेडिकल विमा, राहण्याची आणि जेवणाची सोय ही असणार आहे. पात्र उमेदवारांना रु. 1 लाख 62 हजार 500 पर्यंत मासिक वेतन दिले जाईल.
 

जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक पात्र उमेदवारांनी https://maharashtrainternational.com या अधिकृत संकेतस्थळावर आपला अर्ज भरावा तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर, सी बिल्डिंग, शासकीय निवासस्थान, कावळा नाका, कोल्हापूर, येथे संपर्क साधावा, (दूरध्वनी क्र. 0231-2545677) असे आवाहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.


बांधकाम कामगारांना इस्राईलमध्ये नोकरीची संधी
Total Views: 36