ताज्या बातम्या

नोकरीचे नियम बदलले नवा लेबर कोड काय सांगतो

Job rules have changed! What does the new labor code say


By nisha patil - 12/27/2025 4:43:51 PM
Share This News:



केंद्र सरकार देशात चार नवीन लेबर कोड लागू करण्याच्या तयारीत आहे.
यामुळे खासगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीचे नियम पूर्णपणे बदलणार आहेत.नव्या नियमांनुसार, कर्मचाऱ्यांचा मूळ पगार एकूण पगाराच्या किमान पन्नास टक्के असणे बंधनकारक असेल.

यामुळे इन-हँड पगार कमी होणार असला, तरी पीएफची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
नोकरी सोडल्यास कंपनीला अवघ्या दोन दिवसांत कर्मचाऱ्याला पूर्ण पगार देणे बंधनकारक असेल.

आता ग्रेच्युटीसाठी पाच वर्षांची अट रद्द करण्यात आली असून, फक्त एका वर्षाच्या सेवेनंतरही ग्रेच्युटी मिळणार आहे.

आठवड्याला कमाल अठ्ठेचाळीस तास काम करावे लागणार असून, चार दिवसांचा आठवडा निवडल्यास रोज बारा तास ड्युटी करावी लागेल.

ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त कामासाठी, म्हणजेच ओव्हरटाईमसाठी, कर्मचाऱ्यांना दुप्पट दराने मोबदला मिळणार आहे.

प्रत्येक कर्मचाऱ्याला सॅलरी स्लिप आणि नियुक्ती पत्र देणे आता बंधनकारक असेल.

वीसपेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या सर्व संस्थांमध्ये पीएफचे नियम लागू होणार आहेत.

पहिल्यांदाच डिलिव्हरी बॉय आणि फ्रीलान्सर्सनाही सामाजिक सुरक्षा विम्याचा लाभ मिळणार आहे.

तसेच समान कामासाठी समान वेतनाचा नियमही लागू केला जाणार आहे.

 


नोकरीचे नियम बदलले! नवा लेबर कोड काय सांगतो?
Total Views: 47