बातम्या
विवेकानंद मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जॉब ट्रेनिंग व फिल्ड प्रोजेक्ट उपक्रम संपन्न
By nisha patil - 6/30/2025 5:56:49 PM
Share This News:
विवेकानंद मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जॉब ट्रेनिंग व फिल्ड प्रोजेक्ट उपक्रम संपन्न
कोल्हापूर दि.30 : नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) नुसार विवेकानंद कॉलेज च्या Biotechnology विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने बी एस सी भाग 3 biotechnology विधर्थ्यांचे दि. 26/06/25 ते 28/06/25 या दरम्यान जॉब ट्रेनिंग व फिल्ड प्रोजेक्ट हे उपक्रम झाले सदर उपक्रमा साठी महाविद्यालया चा माजी विद्यार्थी पृथ्वीराज पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
पहिल्या दिवशी विविध औद्योगिक क्षेत्र मधून बाहेर पडणारे सांडपाणी, त्या वर करावी लागणारी प्रक्रिया व तपासणी यावर विद्यार्थ्यांनी प्रयोग शाळेत प्रात्यक्षिक केले दुसऱ्या दिवशी जिल्हापरिषद कार्यलाय कोल्हापुर येथे बसवण्यात आलेल्या बायोगॅस प्लांट ला भेट देणेतआली जिथे कॅन्टीन किचन मधून तयार होणाऱ्या कचऱ्या पासून बायोगॅस तयार होतो याचे प्रात्यक्षिक विद्यर्थ्यांनी अनुभवले
तिसऱ्या दिवशी सांगली येथे पियुष फ्रुट प्रोसेससिंग व कॅनिंग सेंटर येथे फळ प्रक्रिया करून त्या पासून तयार होणारे पदार्थ याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी केले
सदर उपक्रमासाठी महाविद्यालया चे प्राचार्य डॉ आर आर कुंभार, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ श्रुती जोशी यांचे मार्गदर्शन लाभले Biotechnology विभागाचे प्रा एस जी कुलकर्णी व डॉ एस बी मुल्ला यांचे सहकार्य लाभले बी एस सी भाग 3 च्या एकूण 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विवेकानंद मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जॉब ट्रेनिंग व फिल्ड प्रोजेक्ट उपक्रम संपन्न
|