बातम्या
समाजसेवेसाठी एनएसएसमध्ये सहभागी व्हा – डॉ. टी. एम. चौगुले
By nisha patil - 2/8/2025 3:13:02 PM
Share This News:
समाजसेवेसाठी एनएसएसमध्ये सहभागी व्हा – डॉ. टी. एम. चौगुले
कोल्हापूर – “एनएसएसमुळे शिक्षणातून समाजसेवा आणि समाजसेवेतून शिक्षण मिळते,” असे मत शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. टी. एम. चौगुले यांनी व्यक्त केले. शहाजी महाविद्यालयात एनएसएस विभागातर्फे आयोजित व्याख्यानात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. ए. बी. बलुगडे होते. डॉ. विजय देठे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. सी. के. पाटील यांनी आभार मानले. प्रा. सौ. उज्वला पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजसेवेसाठी एनएसएसमध्ये सहभागी व्हा – डॉ. टी. एम. चौगुले
|