बातम्या

संयुक्त शिवजयंती उत्सवास पन्हाळगडावर उत्साहात प्रारंभ

Joint Shiv Jayanti celebrations begin with enthusiasm at Panhalgad


By nisha patil - 4/28/2025 12:13:41 AM
Share This News:



संयुक्त शिवजयंती उत्सवास पन्हाळगडावर उत्साहात प्रारंभ

पन्हाळा प्रतिनिधी , शहाबाज मुजावर  ऐतिहासिक पन्हाळगडावर पारंपरिक संयुक्त शिवजयंती उत्सवास सुरुवात प्रबोधनानी झाली. उत्सवानिमित्त गडावर पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शनिवारी पहिल्या दिवशी सायंकाळी आठच्या दरम्यान सुर्दशन शिंदे यांचे 'शिव विचार व पन्हाळगडाचा इतिहास' या विषयावर व्याख्यान झाले.

या कार्यक्रमासाठी पन्हाळगडावरील स्थानिक नागरिक, महिला बांधारीतील नागरिक प्रबोधन ऐकण्यासाठी  उपस्थित होते. तसेच आज रविवार दिनांक,27/04/25 रात्री आठ वाजता 'छावा' चित्रपट हा दाखवला जाणार आहे, तर सोमवारी दिनांक,28/04/25 रोजी, शिवज्योत घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या सर्व शिवाभक्तांचे स्वागत केले जाणार आहे.

मंगळवारी दिनांक,29/04/25 रोजी सकाळी पन्हाळा शहर परिसरातून मोटारसायकल फेरी रॅली काढली जाईल, तर बुधवारी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी शिवजन्मकाळ सोहळा होणार असून, सायंकाळी पाच वाजता गडावर भव्य मिरवणूक सोहळा होणार आहे. शुक्रवारी दिनांक 2/05/25 रोजी ,महाप्रसादाने उत्सवाची सांगता होणार आहे. हे सर्व कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथेच होतील. सर्व शिवप्रेमी यांचा लाभ घ्यावा .हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान संयुक्त शिवजयंती उत्सव 2025  पन्हाळा यांनी केले आहे.


संयुक्त शिवजयंती उत्सवास पन्हाळगडावर उत्साहात प्रारंभ
Total Views: 378