विशेष बातम्या
गोकुळ व एनडीडीबी डेअरी सर्व्हिसेसची संयुक्त पुढाकार: जातिवंत म्हैशी विक्री केंद्रांची सुरूवात
By nisha patil - 8/12/2025 2:07:07 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) आणि एनडीडीबी डेअरी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त प्रयत्नातून जातिवंत उच्च उत्पादक म्हैशींची विक्री केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार दुधाळ जनावरे सहज उपलब्ध होणार आहेत.
या केंद्रांमध्ये सध्या खालील उच्च उत्पादनक्षम जातींच्या म्हशी उपलब्ध आहेत:
• मुऱ्हा
• सुधारित मुहा
• मेहसाणा
• जाफराबादी
गोकुळ संघाच्या माहितीनुसार, या केंद्रांमधून म्हैस खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना कमाल 40,000 रुपयेपर्यंत सरकारी अनुदान मिळणार असून यामुळे शेतीपूरक व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे.
गोकुळ व एनडीडीबी डेअरी सर्व्हिसेसची संयुक्त पुढाकार: जातिवंत म्हैशी विक्री केंद्रांची सुरूवात
|