बातम्या
जोतिबा यात्रेला लाखोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पालकमंत्र्यांकडून जिल्हा विकासासाठी साकडे
By nisha patil - 12/4/2025 7:51:39 PM
Share This News:
जोतिबा यात्रेला लाखोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पालकमंत्र्यांकडून जिल्हा विकासासाठी साकडे
कोल्हापूर : चैत्र पौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी (जोतिबा डोंगर) येथे पारंपरिक सासनकाठी मिरवणुकीसह यात्रा उत्साहात पार पडली. लाखो भाविकांच्या उपस्थितीत 'जोतिबाच्या नावानं चांगभलं'चा गजर आणि गुलाल-खोबऱ्याच्या उधळणीने अवघा डोंगर भक्तिमय झाला.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांच्या उपस्थितीत मानाच्या १०८ सासनकाठ्यांचे पूजन झाले. यावेळी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या आरोग्य, सुख-समृद्धीसाठी जोतिबाचरणी साकडे घालण्यात आले.
सकाळी ५ वाजता शासकीय अभिषेकाने सोहळ्याची सुरुवात झाली. दुपारी १२ वाजता पूजनानंतर सासनकाठी मिरवणुकीला सुरुवात झाली. सातारा, सांगली, कोल्हापूरसह विविध भागांतील मानाच्या सासनकाठ्यांनी डोंगर फुलवला.
यावर्षी प्लास्टिकमुक्त यात्रेसाठी २५ हजार कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. ३० ठिकाणी पाण्याचे टँकर, ३४ पार्किंग व्यवस्था, अन्नछत्र, लाईव्ह दर्शन, आरोग्य सुविधा
जोतिबा यात्रेला लाखोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पालकमंत्र्यांकडून जिल्हा विकासासाठी साकडे
|