शैक्षणिक
इस्रोमध्ये निवड झालेल्या जोया बागवानचा गौरव...
By nisha patil - 6/17/2025 2:07:01 PM
Share This News:
इस्रोमध्ये निवड झालेल्या जोया बागवानचा गौरव...
मुस्लिम समाजातील मुलींनी संशोधन क्षेत्रात भरारी घ्यावी – गणी आजरेकर
भारत सरकारच्या अंतराळ संशोधन संस्थेत (इस्रो) प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झालेल्या केआयटी कॉलेजच्या विद्यार्थिनी कुमारी जोया जमील बागवान हिचा सत्कार मुस्लिम बोर्डिंग येथे उत्साहात पार पडला. या वेळी संस्थेमार्फत जोयाला ₹२५,००० इतकी प्रोत्साहनपर आर्थिक मदत देण्यात आली.
या कार्यक्रमात मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी शुभेच्छा देताना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी संस्थेच्या घटनेत व्यक्त केलेली अपेक्षा जोया बागवानसारख्या विद्यार्थिनीच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरल्याचे नमूद केले. तसेच, मुस्लिम समाजातील मुलांनी व विशेषतः मुलींनी संशोधन आणि विज्ञान क्षेत्रात भरारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
उपाध्यक्ष आदिल फरास यांनी जोयाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत, “जोया केवळ इस्रोपुरतीच नव्हे तर भविष्यात नासासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेतसुद्धा पोहोचो,” अशी भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासक कादरभाई मलबारी यांनी केले. यावेळी जोया बागवान हिने संस्थेच्या प्रोत्साहनाबद्दल आभार मानले.
या कार्यक्रमाला तिचे आई-वडील, संचालक हाजी लियाकत मुजावर, हाजी जहाँगीर अत्तार, रफीक शेख, मलीक बागवान, रफीक मुल्ला, उद्योजक जावेद शेख (कांडेकरी), चाँदसो जत्राटे, माजी नगरसेवक रफीक मुल्ला, गौसखान पठाण, हाजी रफिक बागवान (पानवाले), बापू मुल्ला, नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक काझी एस.एस. यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
इस्रोमध्ये निवड झालेल्या जोया बागवानचा गौरव...
|