विशेष बातम्या
इस्रोमध्ये निवड झालेल्या जोया बागवान यांचा गौरव
By nisha patil - 6/14/2025 4:02:09 PM
Share This News:
इस्रोमध्ये निवड झालेल्या जोया बागवान यांचा गौरव
आज आपल्या भागातील माननीय सामाजिक कार्यकर्ते श्री इस्माईल बागवान यांनी दक्षिण कोल्हापूरचे लाडके आमदार, आदरणीय अमल महाडिक साहेब यांचे मन:पूर्वक स्वागत केले.
या प्रसंगी आमदार महाडिक साहेब खास उपस्थित होते, कारण आपल्या भागातील विद्यार्थिनी जोया जमीर बागवान हिची इस्रो, अहमदाबाद येथील सॅटेलाइट डेटा विभागात संशोधन व इंटरनशिपसाठी निवड झाली आहे. ही अत्यंत गौरवास्पद बाब असून महाडिक साहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन तिचा सत्कार व प्रोत्साहनपर भेट देण्यासाठी आज भेट दिली.
ही निवड फक्त जोयासाठीच नव्हे, तर संपूर्ण कोल्हापूर आणि विशेषतः वर्षा नगर भागासाठी एक अभिमानास्पद क्षण ठरला आहे.
Isro selection : इस्रोमध्ये निवड झालेल्या जोया बागवान यांचा गौरव
|